In the accident case of the teacher, the crime contractor filed a complaint | शिक्षिकेच्या अपघाती मृत्यु प्रकरणी रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

शिक्षिकेच्या अपघाती मृत्यु प्रकरणी रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देप्राथमिक स्थितीत सदरचा अपघात हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याचा सुर उमटत होता.

वणी : वणी सापुतारा रस्त्यावर शिक्षिकेचा अपघाती मृत्यु हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याची तक्र ार कुटुंबियातील सदस्याने दिल्याने ठेकेदारावर शिक्षेकेच्या मृत्युस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी ह्यह्य एप्रील रोजी वणी सापुतारा रस्त्यावरील खोरीफाटा भागात पुलासाठी खोदलेल्या खडड्याचा अंदाज कारचालकाला आला नाही. त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक अडथळा बॅरीकेटस् नसल्याने सदरची कार सुमारे तीसफुट खड्ड्यात पडल्याने कमल सादुराम ठाकरे या कारमधील शिक्षिकेचा अपघाती मृत्यु झाला. तर सादुराम ठाकरे व नातु गंभीर जखमी झाले. प्राथमिक स्थितीत सदरचा अपघात हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याचा सुर उमटत होता.
दरम्यान दौलत ठाकरे राहणार मालगोंदा पोष्ट सतखाम तालुका सुरगाणा यांनी पोलीसात ठेकेदार राकेश रामदास पाटील वय 38 केकेबी रॉयल डी.एच.पी.जे.व्ही. कंपनी सुरत गुजरात हल्ली राहणार वणी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In the accident case of the teacher, the crime contractor filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.