शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Accident: जेजुरीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 00:22 IST

Accident:इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील युवक देवदर्शनासाठी घोटी - सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात शनिवारी (दि.१३) दुपारी ४ वाजता जेजुरीकडे दर्शनासाठी जात होते.

घोटी -  इगतपुरी तालुक्यातील बिटुर्ली येथील युवक देवदर्शनासाठी घोटी - सिन्नर महामार्गावर धामणगाव शिवारात शनिवारी (दि.१३) दुपारी ४ वाजता जेजुरीकडे दर्शनासाठी जात होते. सिन्नरवरून मिरचीने भरलेला टेम्पो घोटीकडे भरधाव वेगाने येत असताना बोलेरो गाडीला धडक मारल्याने भीषण अपघात होऊन त्यात २ जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने बिटूर्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळील बिटूर्ली येथील काही भाविक जेजुरी येथे देवदर्शनासाठी बोलेरोने (क्रमांक एम एच ०४ डी वाय ०८७५) जात होते. सिन्नरवरून घोटीच्या दिशेने मिरची भरून येणारा टेम्पो (क्रमांक एम एच २१ बीएच ३६६४) भरधाव वेगाने येत होता. धामणगाव शिवारात टेम्पो बोलेरो गाडीवर येऊन आदळला. या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला असून, टेम्पोचेसुद्धा नुकसान झाले आहे. टेम्पोची धडक एवढी भयंकर होती की बोलेरोने काही पलट्या खाऊन तिचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातात अक्षय गोपाल पारधी (२०) व रवींद्र पांडुरंग खडके राहणार बिटूर्ली (१९) जागेवरच ठार झाले, तर समवेत असलेले अक्षय रामनाथ उघडे (२०), भरत बबन इरते (१९) व सचिन सावजी शिद (२०) सर्व रा. बिटूर्ली हे तिघे जखमी झाले आहेत.

गावावर शोककळाअपघात होताच क्षणी सामाजिक कार्यकर्ते खंडूसिंग परदेशी यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. या अपघातामुळे ग्रामीण भागातील छोट्याशा बिटूर्ली गावावर शोककळा पसरली आहे. टेम्पोधारक चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, हवालदार शीतल गायकवाड, सुहास गोसावी आदी करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात