शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इगतपुरीच्या पूर्व भागात मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:13 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असले तरी इगतपुरी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र टाकेद परिसरात दिसत आहे.

ठळक मुद्देतयारी खरिपाची : साठवणुकीसाठी बळीराजाची कसरत

नांदूरवैद्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असले तरी इगतपुरी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत खरीपपूर्व मशागतीचे कामे करण्यात व्यस्त असल्याचे चित्र टाकेद परिसरात दिसत आहे.इगतपुरीच्या पूर्व भागातील नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या कळसूबाई शिखराच्या पायथा ते किल्ले अदन, मदन, अलंग-कुलंग तसेच विश्रामगड- पट्टा किल्ला, म्हैसवळण घाट, चौराई ,वनदेव, तांब कडा, आदिवासीक्र ांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या सोनोशी येथील दºयातील बाडगीची माची, वाघाची गडद या दुर्गम डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या आंबेवाडी, मांजरगाव, खडकेद, इंदोरे, वासाळी, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा, धानोशी, चौराईवाडी, वनदेव टेकडी, फळविहीर वाडी, अडसरे, टाकेद परिसरातील खेड, अधरवड, धामणीची वाडी, पिंपळगाव मोर आदी परिसरात शेतकामांना वेग आलाआहे.ग्रामीण भागातील शेतमजूर वैरण काडी, पेंढा, करडी गवत, लाकूडफाटा, बी-बियाणे, खते याव्यतिरिक्त भात पिकासाठी राबभाजणीच्या कामास शेतातील गवत काढणी, नांगरणी, बांधावरील पालापाचोळा पेटवून देणे आदी कामे करताना दिसत आहे.आदिवासी भागात शेतकऱ्यांना राबभाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते. मात्र, अशा कामांसाठी येथील शेतकरी वृक्षांची कत्तल करीत नाहीत. उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरु पयोगी फांद्या मुख्य झाडाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता छाटून घेतल्या जातात. त्यामध्ये गवत, खत, बांधावरील गवतकाडी व इतर पालापाचोळा टाकून जाळून टाकला जातो. जमीन भाजली जाते. भाजलेली जमीन ही भात, खुरासनी या पिकांच्या रोपांसाठी उपयुक्त ठरते. राबभाजणी अंतिम टप्प्यात आली आहे. लॉकडाउनचा परिणाम प्रामुख्याने शहरी भागात जास्त प्रमाणावर दिसून येत आहे. एकीकडे मजूरटंचाई असली, तरी शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह सर्जा-राज्या बैलजोडीसोबत शेतकामे पूर्ण करण्यावर भर देत आहे. शेतकामांना वेग आल्याने परिसरातील शेतमजुरांना रोजगार मिळला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात आंबे, जांभळे, आवळे, करवंदे, सागवानाची पाने आदी रानमेवा विकून थोड;फार पैसे मिळायचे. मात्र, यंदा कोरोनाच्या संचारबंदीत मोठे नुकसान झाले आहे. रानमेव्याच्या मोबदल्यात कांदे, गहू मिळायचे; पण यंदा ते मिळाले नाही. लवकरच सर्व सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. पाऊस येण्याअगोदर शेतातील कामे आटोपण्याचा आमचाप्रयत्न आहे.- भागू लाहोरे, खडकेद

पाऊस पडायच्या आत डोंगरदºयातील- माळरानावर असलेल्या शेतावरील जेथुडीसाठी फोडून ठेवलेला लाकूडफाटा, गुरांसाठी ठेवलेली वैरणकाडी, पेंढा सुरक्षित ठिकाणी ठेवणे, राबभाजणी, राबाच्या शेतात नांगरणी, वखरणी करणे या कामांच्या पूर्वतयारीची लगबग सुरू आहे. यंदा भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे.- सोमनाथ ठवळे, आंबेवाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी