ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.खरिपाची पिके आवरणी करून आता रब्बी पिकांचे नियोजन सुरू झाले असून पावसाने कांदा रोपांचे सर्वत्र नुकसान केल्याने शेतकऱ्यांना पुन्हा महागडी बियाणे खरेदी करून परत कांदा बी पेरावे लागणार आहे. एवढा पाऊस होऊनही वातावरणात अद्याप गारवा नाही. अद्यापही वातावरणात उष्मा आहे. त्याचा परिणाम कांदा बियाणे उगवण क्षमतेवर होत आहे.कांदा लागवड या वेळेस काही प्रमाणात घटणार असल्याची चर्चा आहे. खरिपात ही बºयाच शेतकºयांनी नवनवीन पिके लागवडीचा प्रयोग केला आहे. तर रब्बी पिकांच्या नियोजनात ही नवीन पीक किंवा भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड आता वाढू लागली आहे. कांदा बरोबर कोबी, टमाटे, कारले, दोडके, शेवगा, गवार, वांगी आदी पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. तसेच ऊस लागवडीचे ही प्रमाण वाढत आहे.कोरोना महामारितही शेतकºयांनी पिके उत्पादन चांगले मिळवले, मात्र लोकडाऊनमुळे पिकवलेले उत्पादन मातीमोल भावात गेल्याने मोठे आर्थिक संकटात शेतकºयांना तोंड द्यावे लागले. आता अनलॉकमुळे पिकवलेले उत्पादन विकण्यास मार्ग मोकळा झाला असला तरी अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे.
पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 14:42 IST
ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग
ठळक मुद्देब्राह्मणगाव : जनावरांच्या चार्याची विशेष काळजी