मशागतीबरोबरच रब्बी पेरणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:34 IST2020-10-30T21:35:09+5:302020-10-31T00:34:29+5:30
ममदापुर : सध्या थंडीने कमी-जास्त प्रमाणात जोर धरल्याने रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी राजा भल्या पाहटेच पेरणी यंत्र घेउन शेतात पेरणी करतांना दिसत आहे.

मशागतीबरोबरच रब्बी पेरणीला वेग
ममदापुर : सध्या थंडीने कमी-जास्त प्रमाणात जोर धरल्याने रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी राजा भल्या पाहटेच पेरणी यंत्र घेउन शेतात पेरणी करतांना दिसत आहे. परिसरात शेतकर्यांनी मशागतीबरोबरच रब्बी गहू, हरभरा पिकांच्या पेरणीला सुरूवात केली आहे. परतीच्या पावसाने परिसरात मका, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या जोरदार पावसाने अनेक शेतात अजूनही काही प्रमाणात पाणी साचून आहे. तर काही ठिकाणी जमिनी अजून वापसा झालेल्या नाही. रब्बीच्या पिकाला शेवटच्या पाण्याची मात्र कमतरता भासणार नाही. त्या दृष्टीने ज्यांना शक्य आहे त्या शेतकरी मंडळींनी मशागत करून गहू, हरभरा आदी पिकांचे बियाणे शेतकरी मातीआड करतांना दिसत आहे. सध्या थंडीलाही सुरूवात होत असल्याने रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पेरणी यंत्राच्या सहाय्याने तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेती औजारे ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने पेरणी करतांना चित्र परिसरात दिसत आहे.