शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

वटार परिसरात कांदा लागवडीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 11:06 PM

वटार : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी वातावरणातील सततचे बदल अशा अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करत, ऑक्टोबर महिन्यात टाकलेली रोपे ७० टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात बियाणे टाकल्यामुळे यंदा लागवडी उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचे मत शेतकरीवर्गातून व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देअवकाळीशी दोन हात करत रोपवाटिका वाचवत लागवड सुरु

वटार : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस, अवकाळी वातावरणातील सततचे बदल अशा अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करत, ऑक्टोबर महिन्यात टाकलेली रोपे ७० टक्क्यांपेक्षा जास्त खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात बियाणे टाकल्यामुळे यंदा लागवडी उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचे मत शेतकरीवर्गातून व्यक्त केले जात आहे.बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील वटार, चौंधाणे, वीरगाव, वनोली, डोंगरेज, कंधाणे, विंचुरे आदी गावांमध्ये कांदा लागवडीने जोर धरला आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही कापलेल्या निसर्गाशी दोन हात करत बळीराजा शेतात राबताना दिसत आहे.जिल्ह्यातील आदिवासी भागातील मजूर वर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेला असल्याने मोठ्या प्रमाणात मंजूर टंचाई निर्माण झाली असून, प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत आहे. तेही रोजंदारीवर न येता कंत्राट पद्धतीने काम करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मजुरीचे दरही वाढले असून, कांदा लागवडीसाठी २५० ते ३०० रुपये रोज मजुरांना द्यावा लागतो. त्यामुळेच बियाणे, खते आदीमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही वाढ झाली आहे.गेल्यावर्षी व यंदा कांद्याला चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकांपेक्षा चार महिन्यांच्या कांदा पिकाची लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे, बियाणे मिळेल त्या दराने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला आहे; परंतु शेतकऱ्यांना अधूनमधून पडणाऱ्या ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात. त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो. ढगाळ हवामानामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सध्या एक एकर लागवडीसाठी मजूरवर्ग १३ ते १५ हजार रुपये मजुरी घेतो. एक एकरासाठी यंदा बियाणांचे बाजारभाव बघता एक लाख रुपयांच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होणार आहे. एवढा खर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळला आहे.यंदा १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार कांदा लागवडयंदा अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे ७० टक्के कांदा रोपे खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एक-दोन नाही तर चार-पाच वेळा कांद्याची बियाणे टाकली, तसेच दर आठवड्याला फवारणी केली. मात्र रोपे चांगली नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार असून, सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत आहे. तरीही रोपे मिळत नाहीत. आहे तेवढ्यात लागवड करत असून, यंदा अजूनसुद्धा शेतकरी बियाणे टाकत आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रोपे टाकले जातील, त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवडी सुरूच राहतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.चौकट...बियाणांमुळे उत्पादन खर्चात दुप्पट वाढपरतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रोपवाटिकांचे नुकसान झाले. परिमाणी शेतकऱ्यांना चार ते पाच वेळेस रोप टाकावी लागली. यामुळे बाजारत कांदा बियाणांचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून कधी एकले नाही अशा सामान्य कंपनीचे देखील बियाणे बाजारात ५ ते ६ हजार रुपये प्रतिकिलोने शेतकऱ्यांनी खरेदी केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बियाण्यामुळे दुप्पट वाढ होणार आहे.मागील काही महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव विचारात घेता. शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. परतीच्या पावसामुळे रब्बी उन्हाळी कांदा लागवडीच्या रोपवाटिकावर विपरीत परिमाण झाल्याने कांदा बियाणांची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांकडील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता मागील वर्षाच्या तुलनेत कांदा लागवडीच्या क्षेत्रात फारसी घट होणार नाही. रोपे लावतांना शेतकऱ्यानी एम ४५, वीस ग्राम, बाविस्टीन १० ग्राम, क्लोरोपार्रिफॉस् २० मीली. दहा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिनिटं कांद्याची रोपे बुडून ठेवायची व वाळवून ती लागवड करायची असे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.- सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकरी, सटाणा.यंदा परतीच्या पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे त्यातच ५ ते ६ हजार रुपये किलो भावाने शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतले. त्याला दर आठवड्याला फवारणी त्यामुळे यंदा कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पैसे देऊन मजूर मिळत नाही, मजुरीचे दामही दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे शेती कसने अवघड झाली आहे.- संतोष बागुल, युवा कांदा उत्पादक शेतकरी.वटार येथे कांदा लागवड करताना मजुर.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती