शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उदय सामंत यांना अभाविपने दाखवले काळे झेंडे, ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, पोलिसांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 14:58 IST

 या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.

नाशिक - शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी तसेच अन्य  मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज नाशिक येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोटर अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज नाशिकमध्ये गंगापूर स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते नाशिक मधून विद्यापीठाकडे जात असताना विद्यापीठाच्या मार्गावर अभाविपच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून मोटार अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दडपशाही करून  कार्यकर्त्यांवर कारवाई केली असा आरोप अभाविपच्या वतीने अभाविपचे प्रदेश मंत्री  स्वप्नील बेगडे यांनी केला आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी या कृतीचा निषेध केला आहे वरिष्ठांच्या नजरेत आपण यावर आणि काहीतरी पद मिळावे यासाठी अभाविपच्या वतीने राज्यात सर्वत्र आपल्या दौऱ्यात अशीच आंदोलने करण्यात येत आहेत मात्र आपण दादागिरीला घाबरणार नाही, संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये असे आपले मत आहे त्यामुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते मात्र त्यांनी अशी दिखाऊ आंदोलन करू नये असा टोला सामंत यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtraमहाराष्ट्र