ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 05:49 PM2019-11-02T17:49:48+5:302019-11-02T17:51:54+5:30

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.

About three hundred hectares of farm damage to Ozar | ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

ओझरला सुमारे तीनशे हेक्टर शेतीचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देसदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे

ओझर : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या आशा धुळीस मिळत असताना दिवसेंदिवस नुकसानीचा वाढता टक्का चिंतेत भर घालत आहे.
ओझर परिसरात शेती मोठ्या प्रमाणात असून एकूण ७३५ हेक्टर द्राक्ष लागवडीपैकी जवळपास २२५ हेक्टर द्राक्ष शेतीचे नुकसान झाले असून ७२ हेक्टर वर सोयाबीन,मका,भुईमूग व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पाऊस उघडल्यावर केला जाणारा खर्च दिवसेंदिवस महागात पडत असून असाच अवकाळी पाऊस आणखीन काही दिवस पडला तर जगणे मुश्किल होऊन जाणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदरच्या पावसाने आगामी काळात बाजारात होणारी उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे असून आधीच मंदीच्या संकटात असणाºया व्यापाऱ्यांनी याचा आतापासून धसका घेतला असल्याचे बोलले जात आहे.
यंदाचा द्राक्ष हंगाम देखील तेजीत राहणार असल्याचे चित्र असले तरी मनासारखा माल न भेटलेच याची शाश्वती नसल्याने निर्यातदारांचे देखील कसब पणाला लागणार आहे. दरवर्षी प्रत्येक निर्यातदारांची बाहेर देशात ठरलेली बाजारपेठ असते. जागतिक बाजारात इतर देशांच्या वाढत्या आव्हानांना आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर तोडीस तोड कलर व्हरायटी उपलब्ध होत असताना त्यासाठी दरवेळी सारखी अर्ली छाटणी देखील केली गेली होती, परंतु फ्लॉविरंग स्टेज मध्ये पावसाने दगा दिला आणि सगळे होत्याचे नव्हते झाले आहे.
यंदा भारताच्या तुलनेत बाकी द्राक्ष उत्पादक देशांनी जर कलर व्हरायटीचा पुरवठा केला गेला तर तो पुढील हंगामात देखील पुन्हा मार्केट सेट करण्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे उत्पादकांनी देखील कोणत्याही परिस्थितीत बाग वाचलीच पाहिजे असा चंग बांधला असून पाऊस जोरदार पडल्यावर देखील बागेत साचणाºया पाण्यात उभे राहून औषध फवारणी केली जात आहे.

चौकट : ओझर क्षेत्रात तलाठी उल्हास देशमुख,सर्कल अधिकारी प्रशांत तांबे यांनी पंचनामे सुरू केले असून आतापर्यंत बाणगंगानगर क्षेत्र पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या भागाचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होतील असे देशमुख यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रि या....
यंदाच्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ डोळ्यासमोर नुकसान ग्रस्त होत असताना सारख्या पडत असलेल्या पावसामुळे नेमके उत्पादन किती होईल याची शास्वती आता देणे कठीण आहे. गुणवत्ता आणि दर्जा टिकवताना देखील मोठी कसरत करावी लागणार असून निर्यातदारांच्या दृष्टीने यंदाचे वर्ष आव्हानाचे ठरू शकते.
तुषार शिंदे, ओझर.
 

Web Title: About three hundred hectares of farm damage to Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.