एसटीला सुमारे १२० कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:12 IST2020-06-22T00:11:12+5:302020-06-22T00:12:32+5:30
शहर, जिल्हा आणि आंतरजिल्हा अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. गेल्या चार महिन्यांत नाशिक जिल्ह्याला सुमारे १२० कोटींचा फटका बसला असून, बसेस सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नसल्याने महामंडळापुढे आर्थिक अनिश्चिततेची परिस्थिती अजूनही कायम आहे.

एसटीला सुमारे १२० कोटींचा फटका
नाशिक : शहर, जिल्हा आणि आंतरजिल्हा अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. गेल्या चार महिन्यांत नाशिक जिल्ह्याला सुमारे १२० कोटींचा फटका बसला असून, बसेस सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नसल्याने महामंडळापुढे आर्थिक अनिश्चिततेची परिस्थिती अजूनही कायम आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मे महिन्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अजूनही बंदच आहेत. जिल्ह्यात सुमारे ८५० बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाºया नाशिक जिल्ह्याला प्रवासी वाहतुकीतून दरमहा सुमारे तीस कोटींपर्यंत उत्पन्न मिळते. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे सर्वांत मोठे जाळे असलेलेया राज्य परिवहन महामंडळाला प्रवासीवाहतूक व सवलतीच्या निधीतून कोट्यवधींचे उत्पन्न मिळते