कॅरम स्पर्धेसाठी अभिषेकची निवड

By Admin | Updated: December 9, 2014 01:16 IST2014-12-09T01:15:23+5:302014-12-09T01:16:08+5:30

कॅरम स्पर्धेसाठी अभिषेकची निवड

Abhishek's selection for the carrom tournament | कॅरम स्पर्धेसाठी अभिषेकची निवड

कॅरम स्पर्धेसाठी अभिषेकची निवड


नाशिक - नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या सबज्युनिअर १४ वर्षवयोगटाखालील स्पर्धेतून पेठे विद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक व्यवहारे याची अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. अभिषेकने रूंग्ठा विद्यालयाच्या विशाल तारगेचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या कामगिरीच्या आधारावर त्याची नांदेड येथे होणाऱ्या ५० व्या राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेकरीता त्याची निवड करण्यात आली आहे. अभिषेक या स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्याला क्रीडा प्रशिक्षक संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या कामगिरीचे आनंद खरे, मुख्याध्यापक चौधरी, यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Abhishek's selection for the carrom tournament