अभिजित तायडे गीत गायन स्पर्धेत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:41 IST2018-11-20T22:41:21+5:302018-11-21T00:41:03+5:30

दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक रायझिंग स्टार गीत गायन स्पर्धेत अभिजित तायडे विजेता ठरला.

Abhijit Taeyde won the singing competition | अभिजित तायडे गीत गायन स्पर्धेत विजयी

अभिजित तायडे गीत गायन स्पर्धेत विजयी

नाशिक : दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक रायझिंग स्टार गीत गायन स्पर्धेत अभिजित तायडे विजेता ठरला.
इंदिरानगर येथील एम अ‍ॅचिव्हर्स नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५ ते १५ व १६ ते २५ या दोन वयोगटात एकूण ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत हिंदी, मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. यातील ३० स्पर्धक उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अंतिम फेरीसाठी अभिजित तायडेसह राधिका पवार, भाग्यश्री क्षीरसागर, हर्षद पवार, विविधा जाधव, पूर्वा क्षीरसागर, सोनाली वर्मा, अश्विनी सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यातून अभिजितने बाजी मारीत नाशिक रायझिंग स्टार होण्याचा मान मिळवला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी दिग्दर्शक किशोर यशोद, मिलिंद यशोद, शिल्पी अवस्थी, रुपाली पवार, नूतन मिस्त्री-निकम, गायिका रेखा महाजन, विजयालक्ष्मी मणेरीकर, मीना परुळेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Abhijit Taeyde won the singing competition