अबब..! पदे ८० अन् इच्छुक आठ हजारांवर
By Admin | Updated: June 5, 2014 01:13 IST2014-06-05T01:06:15+5:302014-06-05T01:13:06+5:30
अबब..! पदे ८० अन् इच्छुक आठ हजारांवर

अबब..! पदे ८० अन् इच्छुक आठ हजारांवर
नाशिक : वाढत्या महागाईबरोबरच राज्यात वाढती बेरोजगारीही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून (लिपिक) पदाच्या भरतीसाठी ८० जागांसाठी तब्बल आठ हजारांहून अधिक इच्छुक परीक्षा देणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ८० कारकून (लिपिक) पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली असून, या कारकून पदासाठी आठ हजार ३९४ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले असून, परीक्षेच्या नियोजनासाठी गुरुवारी (दि. ५) बैठक ठेवण्यात आली आहे. येत्या ८ जून रोजी कारकून पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करण्यासाठी उद्या ही बैठक होणार आहे. जिल्ह्यातील एकूण २२ केंद्रांवर ८ जून रोजी या आठ हजार ३९४ इच्छुकांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अवघ्या ८० कारकून पदाच्या जागा असताना, प्रत्यक्षात आठ हजारंहून अधिक अर्ज भरल्याने त्यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)