लखमापुर येथुन अल्पवयीन मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:11 IST2021-02-14T21:10:56+5:302021-02-15T00:11:09+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखमापुर येथुन अल्पवयीन मुलीचे अपहरण
ठळक मुद्देमुलगी घरातून कोणालाही काहीही न सांगता अनपेक्षितरित्या गायब झाली.
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी विटभट्टीवर मजुरी करणाऱ्या कामगाराची मुलगी घरातून कोणालाही काहीही न सांगता अनपेक्षितरित्या गायब झाली. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. सदर मुलीला फुस लावून तसेच आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी दाखल केल्याने पोलिस तपास करीत आहे.