अबब...मालेगावी पोतेभर तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 01:54 IST2021-12-25T01:54:08+5:302021-12-25T01:54:36+5:30

मालेगाव शहरातील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरातून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात पोत्यात भरलेल्या ३० तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Abb ... Malegaon potbar swords confiscated | अबब...मालेगावी पोतेभर तलवारी जप्त

अबब...मालेगावी पोतेभर तलवारी जप्त

ठळक मुद्देतिघांना अटक : विशेष पथक, शहर पोलिसांचा घरावर छापा

मालेगाव : शहरातील नवापुरा भागातील वरळी रोड परिसरातून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात पोत्यात भरलेल्या ३० तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वरळी रोड परिसरातील एका घरात तलवारींनी भरलेले पोते असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मोहंमद बिलाल याच्या घरात तलवारींनी भरलेले पोते आढळून आले. पोलिसांनी बिलाल याच्यासह महेमुद अब्दुल रशीद व अन्य एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीच्या ३० तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, हवालदार शेखर ठाकूर, पंकज डोंगरे, विशाल गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सावंत, अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, हवालदार वसंत महाले, भूषण खैरनार, संदीप राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घुसर हे करीत आहेत.

 

 

Web Title: Abb ... Malegaon potbar swords confiscated