शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! आठ फुटी अजगर आढळला चक्क सातपूरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:37 IST

नाशिक : शहरात विविध प्रजातीचे सर्प आढळून येणे तसे दुर्मीळ नाही; मात्र चक्क सातपुरजवळील महादेववाडीतील नाल्यालगत रस्त्यावर सुमारे साडेसातफुटी ...

ठळक मुद्देलोकवस्तीजवळ पहिल्यांदाच अजगर प्रजातीचा सर्प आढळून आला. बिनविषारी सर्पांपैकी सर्वात मोठा हा सर्प आहे

नाशिक : शहरात विविध प्रजातीचे सर्प आढळून येणे तसे दुर्मीळ नाही; मात्र चक्क सातपुरजवळील महादेववाडीतील नाल्यालगत रस्त्यावर सुमारे साडेसातफुटी अजगर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आला. वनविभागाच्या रात्रीच्या गस्तीपथकाला माहिती मिळताच तत्काळ पथकाने घटनास्थळ गाठले. सर्पमित्राच्या मदतीने अजगरला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले.महादेववाडीमधील नाल्यापासून काही अंतरावर एका अपार्टमेंटच्याबाहेर लोकवस्तीजवळ अजगर वेटोळे घालून निपचित बसलेला होता. यावेळी नागरिकांना भला मोठा साप दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. तत्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, जगदीश अमलोक, प्रवीण राठोड, वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, सर्पमित्र विजय स्वामी यांनी धाव घेतली. रात्री बारा वाजेच्या सुमारास अजगरला सुरक्षित रेस्क्यू करुन त्र्यंबकेश्वरच्या एका जंगलात सोडण्यात आले.यापुर्वी कधीही शहरी भागातील लोकवस्तीजवळ अशाप्रकारे अजगर आढळून आल्याची नोंद नसल्याचे गोसावी यांनी सांगितले. लोकवस्तीजवळ पहिल्यांदाच अजगर प्रजातीचा सर्प आढळून आला. दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या परिसरातून बेघर होऊन हा सर्प महिंद्र सर्कलच्या परिसरातील एका अपार्टमेंटजवळ आला असावा असा अंदाज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे. अजगर तसा बिनविषारी सर्प असल्याने घाबरण्याचे कारण नाही. अजगराविषयी जनसामान्यांमध्ये विविध गैरसमजुती आहेत. बिनविषारी सर्पांपैकी सर्वात मोठा हा सर्प आहे. या सर्पाविषयीच्या विविध गैरसमजूती केवळ अज्ञानातून तयार झाल्या आहेत. भारतीय अजगराची लांबी कमाल १८ फूट तर किमान १२ फूटापर्यंत असू शकते, असे वन्यजीवप्रेमी भोगले म्हणाले.

टॅग्स :snakeसापNashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका