आयमाच्या पदाधिकर्यांनी स्वीकारला पदभार
By Admin | Updated: June 1, 2014 01:13 IST2014-05-31T00:14:52+5:302014-06-01T01:13:36+5:30
सिडको : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफ्रॅक्चरर्स (आयमा) असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्षस्थानी बी.पी. सोनार होते.

आयमाच्या पदाधिकर्यांनी स्वीकारला पदभार
सिडको : अंबड इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफ्रॅक्चरर्स (आयमा) असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्षस्थानी बी.पी. सोनार होते.
आयमाची वार्षिक सर्वसाधारण सभा सायंकाळी आयमा हाऊसमध्ये खेळीमेळीच्या वातारणात पार पाडली. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झालेले नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडे मावळते अध्यक्ष सुरेश माळी यांनी पदभार सुपूर्द केला. उपाध्यक्ष म्हणून वरुण तलवार, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, मानद सचिव उन्मेश कुलकर्णी, व्यंकटेश मूर्ती, खजिनदार निखिल पांचाले यासह १९ कार्यकारिणी सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष सुरेश माळी यांनी मागील दोन वर्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. यात महापालिकेच्या माध्यमातून अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे पाच कोटी रुपयांची रस्ता डांबरीकरणाची कामे, तसेच गरवारे पॉइंट, अपना हाऊस, सिमेन्स कंपनीसमोर, त्रिमूर्ती चौक यासह पाच ठिकाणी वाहतूक बेट, दोनशेहून अधिक वीजखांब फिटिंगसह वसाहतीत बसविल्याचे सांगितले. याबरोबरच अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही माळी यांनी सांगितले तर नूतन अध्यक्ष विवेक पाटील म्हणाले की, नाशकात नवनवीन उद्योग यावे आणि एकच प्रकारचा टॅक्स भरण्यासाठी यासाठी शासनाच्या माध्यमातून जागा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी जे.आर. वाघ, प्रदीप बूब, जे. एम. पवार, धनंजय बेळे, तुषार चव्हाण, संदीप सोनार, मनीष कोठारी, एम.जी.कुलकर्णी, संतोष मंडलेचा आदिंनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी एम.जे. चंद्रशेखर यांनी निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल उद्योजकांचे आभार मानले.
यावेळी बी.जी. भागवत, ज्ञानेश्वर गोपाळे, उत्तम दोंदे, राधाकृष्ण नाईकवाडे यासह नूतन कार्यकारिणी सदस्य, उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र आहिरे यांनी केले.
फोटो : मावळते अध्यक्ष सुरेश माळी, नूतन अध्यक्ष विवेक पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द करताना. समवेत राजेंद्र अहिरे, उन्मेश कुलकर्णी, वरुण तलवार, बी.पी. सोनार, एम.जे. चंद्रशेखर, ज्ञानेश्वर गोपाळे, निखिल पांचाले आदि.