भाजपा सिडको विभागाच्या वतीने आधारकार्ड नोंदणी

By Admin | Updated: December 29, 2015 22:39 IST2015-12-29T22:18:30+5:302015-12-29T22:39:17+5:30

भाजपा सिडको विभागाच्या वतीने आधारकार्ड नोंदणी

Aadhar card registration on behalf of BJP CIDCO department | भाजपा सिडको विभागाच्या वतीने आधारकार्ड नोंदणी

भाजपा सिडको विभागाच्या वतीने आधारकार्ड नोंदणी

सिडको : भारतीय जनता पार्टी सिडको विभागाच्या वतीने आयोजित मोफत आधारकार्ड नोंदणी शिबिराचे उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मनपा सभागृह इंद्रनगरी, कामटवाडा येथील महापालिकेच्या इंद्रनगरी समागृहात भाजपा मंडल उपाध्यक्ष प्रकाश अमृतकर यांनी मोफत आधारकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. दरम्यान, या शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून, तीन दिवसांत ३00 हून अधिक आधारकार्डांची नोंदणी करण्यात आली. यावेळी आमदार हिरे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात समाजातील तळागाळातील सामान्य जनांविषयी तळमळ असून, त्या तळमळीतूनच विधायक कार्य घडविले जात असल्याचे सांगितले तसेच आयोजक अमृतकर यांनी ‘आधारकार्ड’ काढण्यासाठी ‘आधार’ दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, मंडल अध्यक्ष जगन पाटील, सुरेश पाटील, महेश हिरे, गिरीश पालवे, पप्पू चांदवडकर, गणेश ठाकूर, रवि पाटील, प्रशांत जाधव आदि उपस्थित होते.

Web Title: Aadhar card registration on behalf of BJP CIDCO department