कोटंबी घाटात सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:25 IST2022-02-05T00:24:55+5:302022-02-05T00:25:29+5:30
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाले; तर रस्त्यावर नवीन सिलिंडरचा अक्षरशः खच पडला होता.

कोटंबी घाटात अपघातग्रस्त झालेला सिलिंडरचा ट्रक.
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाले; तर रस्त्यावर नवीन सिलिंडरचा अक्षरशः खच पडला होता.
शुकवार ( दि. ४ ) रोजी नाशिकहून इंडेन कंपनीची नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एमएच-१५-एचएच-३२५९ कोटंबी गावाजवळ कणसरा हॉटेलसमोरच्या वळणावर उलटला. यामुळे ट्रकमधील सिलिंडर रस्त्याच्या कडेला फेकले गेले. याच वेळी समोरून येणारा मोटारसायकलस्वार वैभव पुजारी (४८, रा. नाशिक) हा सिलिंडरच्या गराड्यात दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला.
पेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी घटनास्थळावरून वाहतूक सुरळीत करून ट्रकमालकाशी व जखमींच्या नातेवाइकांशी संपर्क साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.