नाकाबंदीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा बसच्या धडकेत मृत्यू
By Suyog.joshi | Updated: June 19, 2023 14:23 IST2023-06-19T14:21:29+5:302023-06-19T14:23:18+5:30
रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास झाला अपघात

नाकाबंदीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा बसच्या धडकेत मृत्यू
मालेगाव (नाशिक): तालुक्यातील झोडगे येथे महामार्गावर नाकाबंदी वर कर्तव्यावर असलेले तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिलीप जगन्नाथ पाटील (५५) यांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बस क्रमांक एमएच २० बीएल १३८६वरील चालकाने पाटील यांना धडक दिली. पाटील हे जेवणाचा डबा घेऊन रस्त्याने येत असताना बस चालकाने धडक दिली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार खांडेकर हे करीत आहेत.