शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता 

By suyog.joshi | Updated: November 21, 2023 13:56 IST

साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे.

नाशिक  : महापालिकेतर्फे यांत्रिकी झाडू शहरात दाखल झाल्यानंतर आरटीओकडून या चारही मशीनची पासिंग करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून शहरातील जववळपास २८० किलोमीटर मुख्य रस्त्यांची या झाडूने सफाई होऊ शकते. रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू काही दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाले होते. आरटीओची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यांत्रिकी झाडू हाताळणारे प्रशिक्षित कर्मचारी मिळताच या झाडूद्वारे रस्ते स्वच्छता केली जाणार आहे. साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे.

नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामांतर्गत नाशिक महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून विविध उपक्रम राबविले जात आहे. यात हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसविणे आदी कामे होणार आहेत. यातूनच महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू (रोड स्विपर) खरेदी करण्यात आले असून, इटलीहून यांत्रिकी झाडू आणण्यात आले आहे.

दि. २० ऑगस्ट २०२१ला सहा विभागांत यांत्रिक झाडू खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीसह ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. एप्रिल २०२३मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. ऑक्टोबरमध्ये यांत्रिकी झाडू पुरविण्याची मुदत संपुष्टात आली; परंतु परदेशातून मुंबई डॉकयार्ड येथे आल्यावर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात वेळ गेला. त्यामुळे विलंब झाला.

येथील रस्त्यांची होणार सफाईगंगापूर गाव-सीबीएस ते कॅनडा कॉर्नर-कॅनडा कॉर्नर ते भोसला शाळा प्रवेशद्वार-त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव-गडकरी चौक ते तिडके कॉलनी-महात्मा गांधी रस्ता, मेनरोड, नेहरू उद्यान, शालिमार-पंचवटी कारंजा ते रविवार कारंजाम चांडक सर्कल ते मुंबई नाका-मुंबई नाका ते अशोकस्तंभ

महापालिकेच्या वतीने शहरात चार यांत्रिकी झाडू आले असून, आरटीओकडून पासिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ऑपरेटर येताच शहरातील रस्त्यावर यांत्रिकी झाडूद्वारे काम सुरू केले जाईल.- बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग

टॅग्स :Nashikनाशिक