नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत घरात घुसून एकाचा खून

By दिनेश पाठक | Updated: July 5, 2024 14:52 IST2024-07-05T14:52:28+5:302024-07-05T14:52:54+5:30

खून पुर्ववैमनस्यातूनच झाला असल्याचा कयास वर्तविण्यात आला आहे. अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याचा खून कोणी व का केला? याचा भद्रकाली पोलिस शोध घेत आहेत.

A man was killed by breaking into a house in Nashik's Ganjmal slum | नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत घरात घुसून एकाचा खून

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत घरात घुसून एकाचा खून

नाशिक

दिनेश पाठक : भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगर येथे सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. पांडुरंग ऊर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (१९, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे मृताचे नाव आहे. तो गेल्या सहा महिन्यांपासून तडीपार होता. शुक्रवारी (दि.५) पहाटे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात मृतावस्थेत आढळला. त्याच्यात घरात शिरून त्याचेवर वार करण्यात आले.

खून पुर्ववैमनस्यातूनच झाला असल्याचा कयास वर्तविण्यात आला आहे. अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याचा खून कोणी व का केला? याचा भद्रकाली पोलिस शोध घेत आहेत. शहरात खूनाची मालिका सुरूच असून तडीपार गुन्हेगार शहरात वावरत आहे.

Web Title: A man was killed by breaking into a house in Nashik's Ganjmal slum