जुगार अड्ड्यावरील छाप्यात ९३ हजारांची रोकड जप्त

By Admin | Updated: February 9, 2017 00:31 IST2017-02-09T00:31:42+5:302017-02-09T00:31:51+5:30

जुगार अड्ड्यावरील छाप्यात ९३ हजारांची रोकड जप्त

99,000 cash seized in gambling area | जुगार अड्ड्यावरील छाप्यात ९३ हजारांची रोकड जप्त

जुगार अड्ड्यावरील छाप्यात ९३ हजारांची रोकड जप्त

नाशिक : आडगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी (दि़७) सायंकाळी छापा मारून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले
असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा ऐवज जप्त केला आहे़
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या भरकादेवी आइस्क्रीम दुकानाच्या भिंतीलगत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता प्रकाश ओंकार खेडकरसह सहा जण जुगार खेळत होते़ या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ९३ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या सातही जुगाऱ्यांवर आडगाव पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 99,000 cash seized in gambling area