एन्झोकेम विद्यालयाचा ९८ टक्के निकाल
By Admin | Updated: June 1, 2017 01:00 IST2017-06-01T01:00:09+5:302017-06-01T01:00:22+5:30
येवला : येथील एन्झोकेम विद्यालयाचा विज्ञान शाखेचा शेकडा निकाल शेकडा ९८ टक्के लागला.

एन्झोकेम विद्यालयाचा ९८ टक्के निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येथील एन्झोकेम विद्यालयाचा विज्ञान शाखेचा शेकडा निकाल शेकडा ९८ टक्के लागला. विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. मयूरी सुनील धनवटे हिने ८८ टक्के गुण मिळवत येवला केंद्र क्र मांक २१३ मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. उमेर मोहम्मद अन्सारी याने ८७.५३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर ऋषील राजेश पटेल याने ८१.३८ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक प्राप्त केला व आकांक्षा अविनाश कुलकर्णी हिने ८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल शेकडा ९८.०३ टक्के लागला. कु. अनिता नानासाहेब जाधव ७६.३० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम मिळविला आहे. कु. कल्याणी संजय फाळके हिने ७४.६१ टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कु. जयश्री प्रकाश साळवे हिने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. कला शाखेचा शेकडा निकाल ८१ टक्के लागला. कु. आरती दिनकर कोटमे हिने ८०.६१ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राहुल सोपान खोकले याने ७५.९६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. दीपाली सुधाकर येवले हिने ७०.६१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष सुरेश गुजराथी, सेक्रेटरी सुशीलकुमार गुजराथी, सहसेक्रेटरी चिरायू पटेल, प्राचार्य रमेश जाधव, उपप्राचार्य रामदास काहार, पर्यवेक्षक डी.जी. महाले यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा कला शाखेचा शेकडा निकाल ९०.६४ टक्के लागला असून, महेश माणिक कोल्हे याने ७९.३३ टक्के गुण मिळवून नगरसूल केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. सीमा संजय गाडे हिने ७७.९४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्र मांक मिळवला, तर कु. पूजा भारत इप्पर हिने ७७.३० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. एचएससी व्होकेशनल विषयांतर्गत कु. धनश्री अंबादास बारे हिने ७७.२३ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. कु. माधुरी नवनाथ सेंद्र ७४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. अश्विनी संजय पवार ७२.६१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, प्राचार्य एस.पी. नागरे, उपप्राचार्य एन.बी. गायकवाड, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे यांनी अभिनंदन केले.