शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशिक परिक्षेत्रात ९३३ पोलीस कोरोनाबाधित; ७९६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:08 IST

नाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडले. त्यापैकी पाच पोलीस हे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आहे.

ठळक मुद्देनाशिक ग्रामीण दलाने गमावले पाच योद्धेनाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस मृत्युमुखी पडले

नाशिक : मागील सहा महिन्यांपासून कोरोनाशी थेट ‘फ्रन्टलाइन’वर लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने पछाडले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणा-या नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत एकूण ९३३ पोलिसांसह ७६ राज्य राखीव दलाचे जवान आणि २१ होमगार्ड कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ७९६ पोलिसांसह १९ होमगार्ड आणि राज्यराखीव दलाच्या बाधित सर्व जवानांनी कोरोनावर यशस्वी विजय मिळविला. दुर्दैवाने परिक्षेत्रात १० कोरोनायोद्धा पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रिद घेत सेवा बजावणा-या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी वर्गालाही कोरोनाला सामोरे जावे लागत आहे. परिक्षेत्रातील एकूण पाच जिल्ह्यांत सेवा बजावत असताना कोरोनाची पोलिसांना लागण झाली. सर्वाधिक ३३३ पोलीस नाशिक ग्रामीणमधील मालेगावात बंदोबस्तावर असताना बाधित झाले. त्यापैकी ३०६ पोलीस कोरोनामुक्त झाले असून, २७ पोलीस उपचारार्थ दाखल आहेत. दुर्दैवाने पाच पोलिसांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलालाही कोरोनाचा जबर फटका बसला. एकूण २७७ पोलीस बाधित झाले. त्यापैकी २२४ पोलिसांनी कोरोनावर मात केली, तर ५३ पोलीस उपचार घेत आहेत. याच जिल्ह्यात १६ होमगार्ड आणि ७५ राज्य राखीव दलाचे जवानही कोरोनाग्रस्त झाले होते. त्यापैकी दोन होमगार्डचा अपवाद वगळता सर्व जवान कोरोनामुक्त झाले आहे.अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा २३६ पोलिसांसह एक जवान व पाच होमगार्ड कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी २०४ पोलीस व सर्व होमगार्ड कोरोनामुक्त झाले, तर तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात ४८ पोलीस बाधित झाले त्यापैकी ४० पोलीस कोरोनामुक्त झाले, तर नंदुरबार जिल्ह्यात ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी २२ पोलिसांनी कोरोनाला हरविले. सुदैवाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित पोलिसाचा आतापर्यंत मृत्यू झाला नाही. सद्यस्थितीत परिक्षेत्रात कोरोनाबाधित १२७ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि दोन होमगार्ड यांच्यावर उपचार सुरू आहे.नाशिक ग्रामीण दलाने गमावले पाच योद्धेनाशिक परिक्षेत्रात एकूण १० पोलीस कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडले. त्यापैकी पाच पोलीस हे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील आहे. ग्रामीण पोलिसांनी लॉकडाऊन काळात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावात दिवसरात्र चोख बंदोबस्त देत मालेगावाला कोरोनामुक्त करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. मालेगावकरांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा रस्त्यावर २४ तास कडापहारा होता.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस