शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ९३टक्के लोकांचा वैद्यकिय क्षेत्रावर विश्वास नाही : डॉ. अभय बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:13 IST

राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देपालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार वैद्यकीय व्यवसायाची स्थिती रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक सावानाच्या कार्यक्षम आमदार पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली

नाशिक : देशातील आजची वैद्यकीय व्यवसायाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, ९३ टक्के लोकांचा रुग्णालय, डॉक्टरांवर विश्वास राहिला नाही, ही भविष्याच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याची टीका डॉ. अभय बंग यांनी केली.राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बंग प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.मागील पंधरा वर्षांपासून सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने कार्यक्षम याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिजित बगदे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांच्यासह सभागृहात महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. आदी मान्यवर उपस्थित होते. बंग यांच्या हस्ते शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह महाजन यांना प्रदान करण्यात आले. यंदा निवड मंडळाच्या वतीने या पुरस्कारासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांची निवड केली.यावेळी बंग म्हणाले, आजच्या वैद्यकीय व्यवसायाची स्थिती बघता रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक ठरत आहे. देशातील केवळ सात टक्के लोकांचा वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास टिकून आहे ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. देशाला डॉक्टरांची मोठी गरज आहे. देशाच्या आरोग्यविषयक आर्थिक तरतुदीच्या दुप्पट तरतूद अमेरिकेने तेथील श्वानांच्या आरोग्यासाठी केली आहे, असे ते म्हणाले. जेथे गरज आहे तेथे डॉक्टरांची स्पर्धा दिसत नाही व जेथे गरज नाही तेथे स्पर्धा असते, ही शोकांतिका आहे. वैद्यकीय क्षेत्राविषयी सर्र्वसामान्यांच्या मनात असलेला संशय व भीती जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व रुग्णामध्ये निरोधी संबंध निर्माण होणार नाही, असे बंग यावेळी म्हणाले.पुरस्काराने जबाबदारी वाढलीसावानाच्या कार्यक्षम आमदार पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे व यापुढे अधिक दमदारपणे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार आहे.

- गिरीश महाजन, पालक मंत्री

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनNashikनाशिकAbhay Bangअभय बंग