जिल्ह्याचा ९२४ कोटींचा विकास आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST2021-02-05T05:36:53+5:302021-02-05T05:36:53+5:30
कोरोनामुळे गेली वर्षभर कामे होऊ शकली नाहीत, अनेक यंत्रणा कोरोनात गुंतून पडल्या होत्या. त्यामुळे कामे होऊ शकली नाहीत; परंतु ...

जिल्ह्याचा ९२४ कोटींचा विकास आराखडा
कोरोनामुळे गेली वर्षभर कामे होऊ शकली नाहीत, अनेक यंत्रणा कोरोनात गुंतून पडल्या होत्या. त्यामुळे कामे होऊ शकली नाहीत; परंतु गेल्या वर्षी जे झाले ते यावर्षी होऊ नये. अधिकाऱ्यांनी निधी नाही म्हणून कामे करू नयेत असे होता कामा नये अशा शब्दात भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी सुचविलेल्या कामांचे प्राधान्यक्रम ठरवून कामांना सुरुवात करावी. बैठकीत जे काही ठरले आहे त्याचा अहवाल प्रत्येकाला पुढच्या बैठकीत द्यावा लागेल असे सांगून शासनाकडून अतिरिक्त निधी मागवून हा निधी ऊर्जा विकासावर, महिला व बालकल्याणच्या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी, तसेच आरोग्य व रस्ते विकासावर खर्च करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
चौकट====
पोल्ट्रीधारकांना दोन दिवसांत मदत
जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील वाठोडा ग्रामपंचायत हद्दीत एका पोल्ट्रीतील पक्षांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आल्याने साधारणत: दीड हजार पक्षांचे कलिंग करण्यात आले असून, या सर्वांचे पंचनामे करण्यात आले आहेत. प्रत्येक पक्षामागे आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी कालच जिल्ह्याला निधी प्राप्त झाला आहे. येत्या दोन दिवसांत प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर मदतीचे पैसे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.