नायलॉन मांजाचे ९१ गट्टू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:49 AM2021-01-08T01:49:06+5:302021-01-08T01:49:59+5:30

नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्तांकडून शहर व परिसरात बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीदेखील चोरट्या मार्गाने विक्री सुरूच असल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सूचितानगर भागात छापा टाकून नायलॉन मांजाच्या ६२ फिरक्या तसेच गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सातपूर पोलीस ठाणे हद्दीत पिंपळगाव बहुला येथे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास छापा टाकून नायलॉन मांजाचे २९ रीळ हस्तगत केले. या दोन्ही कारवायांमध्ये ९१ गट्टू पोलिसांनी जप्त केले आहेत.

91 bundles of nylon cats seized | नायलॉन मांजाचे ९१ गट्टू जप्त

नायलॉन मांजाचे ९१ गट्टू जप्त

Next

नाशिक : नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्तांकडून शहर व परिसरात बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीदेखील चोरट्या मार्गाने विक्री सुरूच असल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सूचितानगर भागात छापा टाकून नायलॉन मांजाच्या ६२ फिरक्या तसेच गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने सातपूर पोलीस ठाणे हद्दीत पिंपळगाव बहुला येथे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास छापा टाकून नायलॉन मांजाचे २९ रीळ हस्तगत केले. या दोन्ही कारवायांमध्ये ९१ गट्टू पोलिसांनी जप्त केले आहेत.
नायलॉन मांजा विक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी बंदी जाहीर केली आहे; मात्र तरीदेखील चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलिसांनी गुप्त माहिती काढत कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पथक गुरुवारी मांजा विक्रेत्यांची झाडाझडती घेत असतानाच शिपाई मुक्तार शेख यांना सूचितानगर येथील फ्लॅटमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दीपहंस अपार्टमेंट गाठले.  

Web Title: 91 bundles of nylon cats seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.