सिन्नर तालुक्याचा ९०.५५ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 00:03 IST2020-07-16T20:33:50+5:302020-07-17T00:03:28+5:30

सिन्नर : बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून सिन्नर तालुक्यातील ४२१४ पैकी ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विज्ञान महाविद्यालय व खंबाळे येथील श्री सिध्द कपालेश्वर महाविद्यालांनी शंभर टक्के निकालाने बाजी मारली आहे.

90.55 percent result of Sinnar taluka | सिन्नर तालुक्याचा ९०.५५ टक्के निकाल

सिन्नर तालुक्याचा ९०.५५ टक्के निकाल

सिन्नर : बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून सिन्नर तालुक्यातील ४२१४ पैकी ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विज्ञान महाविद्यालय व खंबाळे येथील श्री सिध्द कपालेश्वर महाविद्यालांनी शंभर टक्के निकालाने बाजी मारली आहे. तर १९ उच्च माध्यमिक विद्यालयांनी निकालाची नव्वदी पार केली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यात तालुक्यातील २८ कनिष्ठ महाविद्यालयांतील ४२१४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकुण निकाल ९०.५५ टक्के इतका लागला आहे.
तालुक्यातील महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे. :- जीएमडी आर्टस्, बीडब्ल्यू कॉमर्स व सायन्स कॉलेज सिन्नर - (९१.५९), ब. ना. सारडा उच्च माध्यमिक विद्यालय (९५.८३), महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय (७५.४४), न्यू इंग्लीश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, बारागाविपंप्री (९५.८०), श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लीश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, दोडी (९५.७७), पी. आर. भोर विद्यालय, ठाणगाव (९४.१६), न्यू इंग्लीश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वडांगळी (९०.९५), नूतन विद्यालय आणि अ‍ॅड रावसाहेब शिंदे ज्युनिअर कॉलेज, वावी (९२.०४), देवूपर हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (८८.५७), जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, नायगाव (८९.९२), उच्च माध्यमिक विद्यामंदिर, दापूर (९७.६५), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दातली (९३.०४), जनता विद्यालय, पांढुर्ली (९०.६९), व्ही. पी. नाईक हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, नांदूरशिंगोटे (९७.२९), श्री भैरवनाथ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, शहा (८५.४१), पाथरे ज्युनिअर कॉलेज (७१.४२), टी. एस. दिघोळे विद्यालय, नायगाव (९३.८२), एस. जी. पब्लीक स्कूल, कुंदेवाडी (९८.३३), उच्च माध्यमिक आश्रमशाळा, चापडगाव (७८.१२), जनता विद्यालय, डुबेरे (९०.००), आमदार माणिकराव कोकाटे ज्युनिअर कॉलेज, पंचाळे (९६.०३), श्री साईनारायण गुरुकुल ज्युनिअर कॉलेज, कोनांबे (८६.६६), श्री स्वामी समर्थ विद्यालय, आगासखिंड (१००), शताब्दी सायन्स कॉलेज, आगासखिंड (९०.९०), नवजीवन डे स्कूल, सिन्नर (९६.६२), एस. एस. के महाविद्यालय, वडझीरे (९७.१४), श्री सिद्ध कपालेश्वर ज्युनिअर कॉलेज, खंबाळे (१००), ज्युनिअर कॉलेज, पांगरी (८२.९७), एसबीएस गडाख उच्च माध्यमिक विद्यालय, पंचाळे (९८.१०) टक्के निकाल लागला. एमसीव्हीसी च्या ट्रेडसाठी जी. एम. डी. विद्यालय, सिन्नर (९१.५७), महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, सिन्नर (४५.३३) टक्के इतका निकाल लागला.
मोबाईलद्वारे घरबसल्या निकाल
गुरुवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला मात्र प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि त्यावर इंटरनेट सेवा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी घरबसल्या निकाल मिळवले. परिणामी, शाळांकडे एकही विद्यार्थी फिरकतांना दिसला नाही. केवळ प्राचार्य व शिक्षक निकालाचे आॅनलाईन पत्रक काढून प्रथम, द्वितीय, तृत्तीय आलेल्या विद्यार्थ्यांची तुलनात्मक यादी काढतानाचे चित्र दिसत होते.

Web Title: 90.55 percent result of Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक