नांदूरवैद्य -: वंजारवाडी येथील अमित पंड्या नूतन माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टक्केवारीची परंपरा कायम राखत ग्रामीण भागात टक्केवारीचा उच्चांक गाठला आहे. शाळेची पूजा शंकर जुंद्रे हिने ८७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्र मांक पटकावला. शाळेचा ९० टक्के निकाल लागला. यावेळी शाळेच्या प्रांगणात शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. द्वितीय संजना गोरख कातोरे ८७.४० टक्के, तर सोनाली शिवाजी शिंदे ८५.६ गुण मिळवून तृतीय आली आहे. ाावेळी जीवन गायकवाड, लोहशिंगवे सरपंच संतोष जुंद्रे, वंजारवाडी सरपंच कमल कातोरे,अविनाश कातोरे, संदिप गंधे, बाळासाहेब जुंद्रे, व सर्व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने सोशल डिस्टनिसंग पाळत उपस्थित होते.
वंजारवाडीच्या नूतन विद्यालयाचा ९० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:51 IST