मागील वर्षाच्या तुलनेत नऊ टक्के पाऊस कमीच
By Admin | Updated: August 13, 2015 00:17 IST2015-08-12T23:38:58+5:302015-08-13T00:17:48+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत नऊ टक्के पाऊस कमीच

मागील वर्षाच्या तुलनेत नऊ टक्के पाऊस कमीच
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्या असून, मागील वर्षाच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत सरासरी नऊ टक्के पाऊस कमी होऊन पावसाची सरासरी कायम होती. आता आॅगस्टपासून त्यात घट झाल्याचे चित्र आहे.
बुधवारी (दि. १२) सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हाभरात अवघ्या १०.७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. त्यात नाशिक तालुक्यात १.६, पेठ-१, मालेगाव-१, सुरगाणा-६, निफाड-०.६, येवला-०.५ असा एकूण १०. ७ मिलीमीटर पाऊस झाला असून नऊ तालुक्यात एकही मिलीमीटर पावसाची नोेंद झालेली नाही. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन तीन दिवसांचा अपवाद वगळता पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आलेल्या आहेतच; मात्र पूर्व भागातील येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, बागलाण, देवळा, चांदवड या भागातील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही ठिकाणी जनावरांना चारा मिळत नसल्याने पशुधन मालकांना ही जनावरे मोकाट सोडून देण्याची वेळ येवला तालुक्यात आल्याचे सदस्य कृष्णराव गुंड यांचे म्हणणे आहे.
(प्रतिनिधी)
मागील वर्षी १ जून ते १२ आॅगस्ट दरम्यान पावसाची सरासरी ५१५ मिलीमीटर (४८ टक्के) होती, तीच सरासरी यावर्षी ४१६.६ (३९ टक्के) इतकी नऊ टक्क्यांनी कमी झालेली आहे. जिल्ह्णात सर्वच भागात अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा आहे.(प्रतिनिधी)