सुंदरम मोटर्समध्ये ९ लाखांचा अपहार
By Admin | Updated: December 16, 2015 23:58 IST2015-12-16T23:57:01+5:302015-12-16T23:58:08+5:30
सुंदरम मोटर्समध्ये ९ लाखांचा अपहार

सुंदरम मोटर्समध्ये ९ लाखांचा अपहार
नाशिक : कंपनीत काम करणाऱ्या नोकराने चोरलेल्या स्पेअरपार्टची विक्री करून आलेले पैसे कंपनीत जमा न करता सव्वानऊ लाखांचा अपहार केल्याचे समोर आले आहे़
सुंदरम मोटर्सचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर सूर्यवंशी (३५, द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे संशयित कार्तिक महेश लोहावे (३३, इंद्रायणीनगर, दत्तवाडी, नागपूर) हा कामास होता़ त्याने मार्च ते मे २०१५ या कालावधीत स्पेअरपार्ट चोरून नेले व विक्रीतून आलेले ९ लाख ३० हजार १५८ रुपये कंपनीकडे जमा न करता या रकमेचा अपहार केला़ या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़