बागलाण तालुक्यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:56 IST2021-01-05T20:30:33+5:302021-01-06T00:56:15+5:30
सटाणा: बागलाण तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या चाळीस ग्रामपंचायतींपैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ४०९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चाळीस ग्रामपंचायतीच्या ३९८ जागांपैकी १६३ जागा बिनविरोध झाल्या, तर नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. आता उर्वरित ३१ ग्रामपंचायतींसाठी ५४० उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावणार आहेत.

बागलाण तालुक्यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध
अनुसूचीत जाती-जमाती व इतर मागास प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करता न आल्याने, सहा ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. नऊ ग्रामपंचायतींवर ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लखमापूर, ब्राह्मणगाव, नामपुर, कंधाणे या ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती व निवडून आलेले उमेदवार :
जुनी शेमळी : वार्ड १- रोशन पवार, वैशाली शेलार, सुनंदा गांगुर्डे. वार्ड २ झ्र संदीप बच्छाव, चित्रा बागुल, सुवर्णा बच्छाव. वार्ड ३ झ्र अनिल गायकवाड, सुरेखा बोरसे, कल्पना शेलार. नवी शेमळी : वार्ड ३झ्र शाम निकम, निंबाबाई मोरे, सीमा बधान. वार्ड २ झ्र दादाजी निकम, सुलाबाई बोरसे. वार्ड ३ झ्र शिवाजी जाधव, लताबाई सूर्यवंशी. मोराणे सांडस : वार्ड १ झ्र सुमनबाई शेवाळे, महेंद्र शेवाळे. वार्ड २ झ्र शामराव पिंपळसे, रत्ना मोरे. वार्ड ३झ्र गंगाधर शेवाळे, विजया गांगुर्डे. रामतीर : वार्ड १ झ्र केदा अहिरे, विमल अहिरे, सुनंदा अहिरे. वार्ड २ झ्र युवराज अहिरे, उर्मिला अहिर. वार्ड ३ झ्र बाळू अहिरे, हिरूबाई अहिरे यांचा समावेश आहे.