लासलगावला ९ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:27 IST2020-07-13T20:25:57+5:302020-07-14T02:27:31+5:30
लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

लासलगावला ९ जण कोरोनामुक्त
लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील एक, विंचुर येथील ३, सुकेणा येथील २ व ओझर येथील एक असे नऊ रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत. लासलगाव ग्रामीण रु ग्णालयात येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने उपचार घेत होते. या नऊ कोरोना बाधित रु ग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची घरवापसी दिलासा देणारी ठरली आहे. आतापर्यंत ८५ रूग्ण बरे झाले असून २१ रूग्ण उपचार घेत आहेत.
------------
पिंपळगाव बसवंतला
पुन्हा बाधित रुग्ण
पिंपळगाव बसवंत : शहरात चार-पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी (दि.१२) रात्री उशिरा प्राप्त अहवालात शहरातील उंबरखेडरोडवरील ४३ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली.
पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेडरोड येथील महिला काही दिवसांपूर्वी बाहेरून प्रवास करून आल्याने तिला कोरोना सदृश लक्षणे जाणवली. रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालात महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. कुटुंबातील सदस्यांना क्वॉरण्टाइन करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. शहरातील कोरोना बाधितांची संख्या ५१ वर पोहोचली असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे़