शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ९६ वर्ग-१ अधिकाऱ्यांना पदोन्नती

By admin | Updated: August 1, 2014 01:11 IST

राज्यातील ९६ वर्ग-१ अधिकाऱ्यांना पदोन्नती

नाशिक : महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी पदावरील तदर्थ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यातील ९६ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, नाशिक विभागातील सहा अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.रिक्त असलेल्या बागलाण गटविकास अधिकारीपदी दहीवडी (सातारा) येथील सहायक गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नांदगावचे बालविकास प्रकल्प अधिकारी ए. व्ही. पटाईत यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकपदी पदोन्नती झाली आहे. त्याचप्रमाणे दिंडोरीचे सहायक गटविकास अधिकारी सी. आर. भावसार यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकपदी बदली झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सहायक प्रकल्प अधिकारी सी. टी. येवला यांची गडचिरोली जिल्हा परिषदेच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकपदी बदली झाली आहे. त्याचप्रमाणे सुरगाणा तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी एम. व्ही. मुरकुटे यांची पातूर (अकोला) पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी, तर विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक गटविकास अधिकारी जे. एन. आभाळे यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी पदोन्नती झाली आहे. पदोन्नती मिळालेल्या राज्यातील ९६ अधिकाऱ्यांचा पदोन्नतीच्या कार्यवाहीत समावेश आहे. (प्रतिनिधी)