९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन
By Admin | Updated: January 30, 2017 00:33 IST2017-01-30T00:33:21+5:302017-01-30T00:33:36+5:30
महाआरोग्य शिबिर : तात्याराव लहाने करणार शस्त्रक्रिया

९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन
नाशिक : शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराकरिता नोंदणी झालेल्या सुमारे सहा हजार २३९ रु ग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. या शस्त्रक्रि या ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने करणार आहेत. यावेळी नोंदणीकृत गरजू रु ग्णांना मोफत चष्मे वाटपही करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियांच्या प्रथम टप्प्यात ६ फेब्रुवारीला जिल्हा रु ग्णालय येथे डोळ्यांची फेरतपासणी करून ७, ८ व ९ फेब्रुवारी या तीन दिवसांत नाशिक ग्रामीण व नाशिक शहरातील ३५३ शस्त्रक्रि या करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक ग्रामीण (उत्तर) येथील नोंदणीकृत रु ग्णांची २१ फेब्रुवारीला फेरतपासणी करून २२, २३ व २४ फेब्रुवारी रोजी ३४२ रु ग्णांच्या शस्त्रक्रि या करण्यात येतील. तिसऱ्या टप्प्यात मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयत पेठ, सुरगाणा, निफाड, दिंडोरी व नाशिक ग्रामीण (दक्षिण) येथील नोंदणीकृत
रु ग्णांची २ मार्चला फेरतपासणी करून ३, ४ व ५ मार्चला ३६१ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळासाठी संबंधित रु ग्णालयांची डॉ. तात्याराव लहाने यांनी समक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नाईक, रामेश्वर नाईक आदि उपस्थित होते.