शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मोलकरीणने लांबविले ९५ हजारांचे दागिणे     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 14:25 IST

काही दिवसांपुर्वी सातपूर भागात अशाच पध्दतीने तीन ते चार मोलकरणींनी मिळून लाखो रुपयांच्या दागिण्यांचा अपहार केल्याची घटना घडली होती.

ठळक मुद्दे नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे दहा हजाराची रोकड लंपास

नाशिक : घरकामासाठी मोलकरीण ठेवताना संबंधितांनी तिचे काही मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रती मागवून घेणे गरजेचे आहे. शहरात दुसऱ्यांदा मोलकरीणकडून ९५ हजारांचे दागिण्यांसह दहा हजाराची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीसांनी संशयित मोलकरीणविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, अनुश्री मदन क्षत्रीय (३४, भिकुसा भवन, सीबीएस) यांच्या राहत्या घरात मोलकरीण शोभा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हिने सुमारे ९५ हजारांचे दागिणे आणि दहा हजाराची रोकड असा एकूण १ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी क्षत्रीय यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित शोभाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शोभा ही मोलकरीण म्हणून घरकामासाठी क्षत्रीय यांच्याकडे येत होती. बुधवारी (दि.२) संशयित शोभा हिने राहत्या घरात क्षत्रीय यांच्या आईच्या खोलीत जाऊन कपाटामधील ४० हजाराचे २०ग्रॅम वजनाचे डायमंड असलेले सोन्याचे मंगळसुत्र, ३५ हजार रुपये किंमतीचे १५ग्रॅमचे डायमंड खडे असलेले मंगळसुत्र तसेच २० हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक गिरमे करीत आहेत.काही दिवसांपुर्वी सातपूर भागात अशाच पध्दतीने तीन ते चार मोलकरणींनी मिळून लाखो रुपयांच्या दागिण्यांचा अपहार केल्याची घटना घडली होती. यामुळे मोलकरीण घरात ठेवताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मोलकरीणचे पुर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह आधारकार्ड, मतदान कार्डासारखे महत्त्वाच्या पुराव्यांच्या सत्यप्रती स्वत:जवळ बाळगणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काही गुन्हा घडल्यास संबंधितांवर संशय बळावल्यास पोलिसांना पुढील तपासासाठी अशा कागदपत्रांच्या पुराव्यांमुळे मदत होऊ शकते तसेच मुळ कागदपत्र घेऊन ठेवल्यामुळे मोलकरीणवरदेखील मानसिकदृष्ट्या एक दबाव तयार झालेला असतो त्यामुळे गुन्हा करण्यापुर्वी ती घाबरते असे पोलिसांचे म्हणणे आहे

        

टॅग्स :theftचोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी