९५ कर्मचाऱ्यांना गैरहजेरी भोवणार

By Admin | Updated: February 12, 2017 00:48 IST2017-02-12T00:48:18+5:302017-02-12T00:48:32+5:30

प्रशिक्षणाला दांडी : आज पुन्हा सराव

9 5 employees absenteeism | ९५ कर्मचाऱ्यांना गैरहजेरी भोवणार

९५ कर्मचाऱ्यांना गैरहजेरी भोवणार

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि. १२ ) तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. गेल्या रविवारी (दि. ५) झालेल्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांपैकी २०५ कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या कार्यशाळेला हजर राहण्याची हमी दिली, परंतु ९५ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असून, त्यांनी हजेरी न लावल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
मनपा निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, तर २३ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकी पाच कर्मचारी असलेल्या १६०० पथकांची म्हणजेच ८००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील शिपाई वगळून सहा हजार ४०० कर्मचाऱ्यांना गेल्या रविवारी मतदानाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. परंतु, या कार्यशाळेला सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे महापालिकेने संबंधित गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.

Web Title: 9 5 employees absenteeism