९४ गुन्हेगारांना ‘खाकी’चा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:26 IST2019-04-19T23:52:56+5:302019-04-20T00:26:06+5:30
नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत गुरुवारी (दि.१८) ‘मिशन आॅल आउट’ही विशेष मोहीम पोलिसांनी राबविली. यावेळी १३० सराईत गुन्हेगारांपैकी ९४ ...

९४ गुन्हेगारांना ‘खाकी’चा दणका
नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत गुरुवारी (दि.१८) ‘मिशन आॅल आउट’ही विशेष मोहीम पोलिसांनी राबविली. यावेळी १३० सराईत गुन्हेगारांपैकी ९४ गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, ५७ तडीपार गुंडांची तपासणी करण्यात आली.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय चार पथके तयार करून मोहीम राबविली. या मोहिमेला रात्री ११ वाजता एकाचवेळी सर्वत्र प्रारंभ करण्यात आला. यावेळी तडीपार गुन्हेगारदेखील तपासण्यात आले. दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वडाळागावात एक तडीपार व मुंबईमधील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत तडीपार गणेश भास्कर याच्यावर कारवाई करण्यात आली. विविध जबरी गुन्ह्यांमध्ये हवे असलेले ६४ पैकी ९ गुन्हेगार पोलिसांना मिळून आले.
यावेळी शहर व परिसरातील १३३ हॉटेल, लॉज, ढाबे तपासण्यात येऊन ६ ढाबे, लॉजवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘मिशन आॅल आउट’ मोहीम अशी..
नाकाबंदी : १,५७३ वाहनांची तपासणी.
१८४ वाहनचालकांवर कारवाई.
४२ हजारांचा दंड वसूल.
झोपडपट्टी तपासणी : ३३
टवाळखोरांवर कारवाई : २२
अवैध दारूचा साठा जप्त
लॉज/ढाबे तपासणी : १३३