बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला ९२ लाखांना गंडा
By Admin | Updated: July 5, 2017 01:14 IST2017-07-05T01:13:58+5:302017-07-05T01:14:30+5:30
नाशिक : कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

बनावट कागदपत्रांद्वारे बँकेला ९२ लाखांना गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महात्मानगरमधील एका बँकेस नऊ संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर करून ९२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर बँकेच्या हप्त्यांची परतफेड न करता गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या फसवणुकीमध्ये तीन महिलांचाही सहभाग आहे़
रितेश राजेंद्र कुमार (३७, रा़हरिआंगण अपार्टमेंट, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च २०१४ ते २०१७ या कालावधीत महात्मानगरमधील स्टेट बँक आॅफ बिकानेर अॅण्ड जयपूर या बँकेत संशयित विजयकुमार मोतीराम पाटील, करुणा विजय पाटील (दोघे रा़ शिवनंदन अपार्टमेंट, मेहेरधाम, पंचवटी), दिलीप चिमाजी बोराडे, भारती दिलीप बोराडे (दोघे़ रा़सिद्धप्रिय अपार्टमेंट, जेलरोड), प्रमोद युवराज सूर्यवंशी (रा़उत्तमनगर, सिडको), शैलेंद्र ध्रुव पाटील (राक़ुलस्वामिनीनगर, नाशिक) व दोन अनोळखी पुरुष व महिला
यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासवून बँकेकडून ९२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले़ मात्र
बँकेच्या हप्ते वा मुद्दलाची परतफेड न करता या कर्जाच्या रकमेचा अपहार केला़