मालेगावी ८६ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:59 IST2019-01-05T00:58:53+5:302019-01-05T00:59:05+5:30

मालेगाव येथील द्याने रमजानपुरा पोलिसांनी हनीफनगर भागातील गरीब नवाज किरणा दुकानाशेजारी छापा टाकून ८६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला व सुगंधी तंबाखू असा माल जप्त केला.

86 thousand gutkha of Malegaon seized | मालेगावी ८६ हजारांचा गुटखा जप्त

मालेगावी ८६ हजारांचा गुटखा जप्त

नाशिक : मालेगाव येथील द्याने रमजानपुरा पोलिसांनी हनीफनगर भागातील गरीब नवाज किरणा दुकानाशेजारी छापा टाकून ८६ हजार ६४० रुपयांचा पान मसाला व सुगंधी तंबाखू असा माल जप्त केला. या प्रकरणी रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जे. ए. पळे, पोलीस नाईक दिनेश पवार, पोलीस कर्मचारी सुनील भामरे, भाऊसाहेब ताळीस यांनी बुधवारी हनीफनगर भागात छापा टाकून मोहंमद अली मोहंमद इब्राहीम (१९) याच्या ताब्यातून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केली. पुढील कारवाईसाठी सदर माल व आरोपी यांना नाशिकच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: 86 thousand gutkha of Malegaon seized