दोन दिवसात ८१९ रुपये गल्ला; डिझेलवर १४ हजार रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:39 PM2020-07-09T17:39:37+5:302020-07-09T17:40:01+5:30

लासलगाव आगार : लाल परीला प्रवाशांची प्रतीक्षा

819 in two days; 14,000 on diesel | दोन दिवसात ८१९ रुपये गल्ला; डिझेलवर १४ हजार रुपये खर्च

दोन दिवसात ८१९ रुपये गल्ला; डिझेलवर १४ हजार रुपये खर्च

Next
ठळक मुद्देलासलगाव एसटी आगारकडून लासलगाव-चांदवड ,लासलगाव-मनमाड आणि लासलगाव-निफाड या मार्गावर बस फेऱ्या

लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून जिल्हाबंदी असल्याने आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सार्वजनिक वाहतुकसेवाही बंद आहे. जिल्हा अंतर्गत एसटी सेवेला परवानगी देण्यात आली मात्र एसटीकडे अजूनही प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसात लासलगाव आगाराला ८०० किमी अंतर कापून अवघे ८१९ रु पयांचे उत्पन्न मिळाले. दोन दिवसात डिझेलवर मात्र १४ हजार रु पये खर्च झाला आहे.
लासलगाव एसटी आगारकडून लासलगाव-चांदवड ,लासलगाव-मनमाड आणि लासलगाव-निफाड या मार्गावर बस फेऱ्या सुरू असून या मार्गावर दोन दिवसात ४० प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून लासलगाव आगारला अवघे ८१९ रु पयांचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगाव आगार व्यवस्थापक समर्थ शेळके यांनी जास्तीजास्त प्रवाशांनी एसटी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Web Title: 819 in two days; 14,000 on diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.