एनडीएसटीसाठी ८१ टक्के मतदान

By Admin | Updated: August 2, 2015 23:58 IST2015-08-02T23:56:17+5:302015-08-02T23:58:09+5:30

९,१७३ सदस्यांनी केले मतदान : ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आज मतमोजणी

81 percent voting for NDST | एनडीएसटीसाठी ८१ टक्के मतदान

एनडीएसटीसाठी ८१ टक्के मतदान

एनडीएसटीसाठी ८१ टक्के मतदान९,१७३ सदस्यांनी केले मतदान : ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; आज मतमोजणीनाशिक : नाशिक जिल्हा सेकंडरी टीचर्स असोसिएशन (एनडीएसटी)च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाणे यांनी दिली.
रविवारी सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्णातील २६ मतदान केंद्रांवर सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सोसायटीच्या ११ हजार ३३९ सदस्यांपैकी ९ हजार १७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी (दि.३) सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे़
जिल्ह्णातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या अनुषंगाने महत्त्वाची समजली जाणारी एनडीएसटी अर्थात माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडीचे नेते प्रा. प्रकाश सोनवणे व प्रा. पुरुषोत्तम रकिबे यांचे आपलं पॅनल, आमदार अपूर्व हिरे यांचे समर्थ पॅनल, फिरोजशहा बादशहा यांचे टीडीएफ तसेच अन्य एक प्रगती अशा चार पॅनलमुळे चौरंगी लढत झाली़ रविवारी सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्णातील सर्व २६ मतदान केंद्रांवर शांततेत मतदानास सुरुवात झाली़
भ्रष्टाचार, गुंडगिरी, गद्दारी, अपहार आणि मनमानी या मुद्द्यांचा चारही पॅनलने चांगला प्रचार केला होता़ रविवारी झालेल्या मतदानानंतर चार पॅनलमधील ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले़ या चार पॅनलमध्ये कोणता पॅनल बहुमताने निवडून येतो की प्रत्येक पॅनलमधील उमेदवाराला मतदार संधी देतात याचा फैसला आज होणार आहे़ (प्रतिनिधी)

एनडीएसटीसाठी झालेले मतदान
(एकूण मतदान / झालेले मतदान / टक्केवारी)
४नाशिक : २३६६ पैकी १६१८ (६८)
४इगतपुरी : ५६१ पैकी ४६७ (८३़२४)
४त्र्यंबकेश्वर : ४४१ पैकी ३३७ (७६़४२)
४पेठ : ३४० पैकी २१९ (६४़४१)
४सुरगाणा : ४९३ पैकी ४३७ (८८़६४)
४सटाणा : ८७० पैकी ७६० (७८़३५)
४कळवण : ६१३ पैकी ५१५ (७८़़३३)
४देवळा : ४५७ पैकी ४०८ (८९़२८)
४चांदवड : ५१४ पैकी ४१८ (८१़३२)
४नांदगाव : ५२९ पैकी ४४४ (८३़९३)
४मालेगाव : १५४३ पैकी १३५१ (८७़५५)
४येवला : ६१८ पैकी ५५१ (८९़१५)
४निफाड : ७६५ पैकी ६४३ (८४़०५)
४दिंडोरी : ७३९ पैकी ५९४ (८०़३७)
४सिन्नर : ४९० पैकी ४११ (८३़८८)
४एकूण मतदान : ११,३३९ पैकी ९,१७५ (८०़९०)

Web Title: 81 percent voting for NDST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.