सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे सांगून ८० हजारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:10+5:302021-06-17T04:11:10+5:30
कसबे सुकेणे : रसलपूर शिवारात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वारास अडवून सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे ...

सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे सांगून ८० हजारांना गंडा
कसबे सुकेणे : रसलपूर शिवारात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वारास अडवून सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे सांगून, गाडीच्या डिक्कीतील १ तोळा वजनाची सोन्याची अंगठी व रोख २५ हजार रुपये हातोहात लांबविले. निफाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे. निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद-नाशिक राजमार्गावरील रसलपूर शिवारात दि. १५ मंगळवारी ही घटना घडली. नागापूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर उमाजी जमधडे यांची दुचाकी अडवून भामट्यांनी सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे असून, गांज्याची चौकशी सुरू आहे, असे सांगून तुमच्याकडील किमती वस्तू व पैसे व्यवस्थित ठेवा, असे सांगत, रुमाल गुंडाळून दिलेले १ तोळा सोन्याची अंगठी, रोख २५ हजार रुपये हे हात चलाखीने पुन्हा गाडीच्या डिक्कीत ठेवायचे नाटक करून सदरचा ऐवज लांबवून हे भामटे पसार झाले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर मधुकर जमधडे यांनी निफाड पोलीस ठाणे गाठून अज्ञात ठकाविरुद्ध तक्रार दिली असून, निफाड पोलिसांनी ठकबाजीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपस पोलीस निरीक्षक श्रीरंग सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय माळी करत आहे.