सागर देशमुखसह ८ जणांना पाच दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:03+5:302021-05-08T04:14:03+5:30

इंदिरानगर : महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सागर देशमुख यांच्यासह आठ जणांची ...

8 people including Sagar Deshmukh remanded in police custody for five days | सागर देशमुखसह ८ जणांना पाच दिवस पोलीस कोठडी

सागर देशमुखसह ८ जणांना पाच दिवस पोलीस कोठडी

इंदिरानगर : महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सागर देशमुख यांच्यासह आठ जणांची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सागर देशमुखसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी शिर्डीतून ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी (दि.७) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठही जणांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर देशमुख विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी देशमुख फरार असताना गुरुवारी (दि.६) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर लिंक व्हायरल करून लाईव्ह व्हिडिओ प्रसारित करून शहरातील सार्वजनिक शांतता बिघडण्यास कारणीभूत ठरेल, सामाजिक एकोप्यास बाधा होईल, असे कृत्य केले म्हणून इंदिरानगर पोलीस ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे राजीवनगर येथील संपर्क कार्यालयवर दुपारी एक वाजेच्या सुमारास आठ ते दहा मोटरसायकलवर संशयित आरोपी सागर देशमुख व त्याचे दहा ते पंधरा साथीदारांनी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली. तसेच कार्यालयाबाहेर उभी असलेली महापालिकेची शासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती तसेच केबल व्यवसायाचे सुमारे साडेबारा हजार रुपये लुटून नेले तोडफोड करून जाताना टोळक्यांनी तुम्हाला सगळ्यांना बघून घेऊ असा दमही त्यांनी दिला होता इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर देशमुखसह त्याच्या साथीदारांवर दरोडा, शासकीय वाहनाचे नुकसान, दंगलसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: 8 people including Sagar Deshmukh remanded in police custody for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.