पीएफमधून ७५ टक्के रक्कम काढता येणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:32 IST2020-04-11T21:24:33+5:302020-04-12T00:32:14+5:30
नाशिक : सध्या सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे अनेकांना आपली शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. मात्र भविष्य निर्वाह निधी सदस्यांना आता आधार कार्डच्या आधारे त्यांची चुकीची जन्मतारीख आॅनलाइन पद्धतीने बदलता येणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे कामगारांना ७५ टक्के रक्कम काढता येणे शक्य झाले आहे .

पीएफमधून ७५ टक्के रक्कम काढता येणे शक्य
नाशिक : सध्या सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे अनेकांना आपली शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. मात्र भविष्य निर्वाह निधी सदस्यांना आता आधार कार्डच्या आधारे त्यांची चुकीची जन्मतारीख आॅनलाइन पद्धतीने बदलता येणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे कामगारांना ७५ टक्के रक्कम काढता येणे शक्य झाले आहे . सर्व देशभर कोरोनाची साथ पसरल्याने या पार्श्वभूमीवर या सदस्यांना त्यांची जन्मतारीख सुधारण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले आहे .त्यासाठी आपल्या क्षेत्रात कार्यालयात सुधारित सूचना देण्यात आले आहेत .अशा सर्व सदस्यांना त्यांची आधार मध्ये नोंदलेली जन्मतारीख ही आता सुधारण्याच्या उद्देशाने जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राहय धरली जाईल. जर त्या दोन तारखांमध्ये फरक तीन वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना या निर्णयाचा लाभ घेता येईल, तसेच सदर पीएफ सदस्यासंबंधी सुधारणा करण्याची विनंती करुन आॅनलाइन सबमिट करू शकतील, त्यामुळे ईपीएफओला युआयडीएआय सदस्यांची जन्मतारीख त्वरित प्रमाणित करण्यात येईल, ईपीएफओ आॅनलाईन प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी व पीएफ सदस्यांना आर्थिक अडचणीतून दिलासा देण्यासाठी कोवीड-१९च्या पार्श्वभूमीवर पीएफमधून आगाऊ रक्कम कोणत्याही प्रक्रियेविना काढता येणार आहे. त्यासाठी सदस्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सूचना ईपीएफओने केली आहे.