देशी दारूचे दुकान फोडून बाटल्याचे ७८ खोके गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST2021-04-20T04:15:43+5:302021-04-20T04:15:43+5:30

---- नाशिक : देशी दारू विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी प्रिन्स संत्रा नावाच्या दारूच्या बाटल्यांनी भरलेले ७८ खोके चोरट्यांनी गायब ...

78 bottles of bottles go missing after breaking into a local liquor store | देशी दारूचे दुकान फोडून बाटल्याचे ७८ खोके गायब

देशी दारूचे दुकान फोडून बाटल्याचे ७८ खोके गायब

----

नाशिक : देशी दारू विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी प्रिन्स संत्रा नावाच्या दारूच्या बाटल्यांनी भरलेले ७८ खोके चोरट्यांनी गायब केले. ही घटना पंचशीलनगर भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंजमाळ सिग्नलजवळ विजय गंगाराम विधाते (रा. टाकळी रोड, द्वारका) यांचे देशी दारू विक्रीचे दुकान आहे. संचारबंदीमुळे दुकान बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी दि. २ ते १८ एप्रिलच्या दरम्यान यांचे बंद दुकानाच्या पाठीमागील शटरची कुलुपे तोडून प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूचे तब्बल ७८ खोके चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात सुमारे १ लाख ८३ हजार ३०० रुपये किमतीची दारू होती, असे फिर्यादीत विधाते यांनी म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 78 bottles of bottles go missing after breaking into a local liquor store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.