जिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ७७ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:44 IST2021-02-18T00:43:20+5:302021-02-18T00:44:19+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून सर्व प्रकारच्या सुविधा त्यात आहेत. नाशिकमधील सिव्हिलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची शुश्रूषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोना कालावधीनंतर सिव्हीलच्या नित्य कारभारावर या तुटवड्यामुळे प्रचंड ताण येत आहे.

77 posts of doctors are vacant in government hospitals in the district | जिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ७७ पदे रिक्त

जिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ७७ पदे रिक्त

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून सर्व प्रकारच्या सुविधा त्यात आहेत. नाशिकमधील सिव्हिलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची शुश्रूषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोना कालावधीनंतर सिव्हीलच्या नित्य कारभारावर या तुटवड्यामुळे प्रचंड ताण येत आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक शुश्रूषेसाठी दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्यास सिव्हिलमध्ये प्राधान्य देण्यात येते. सिव्हिलमध्ये दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार प्राप्त होतील, या विश्वासाने दाखल होतात. सिव्हिलमध्ये मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, शल्यचिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे. मात्र, ज्या प्रमाणात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, तेवढे उपलब्ध झालेले नाही .त्या तुलनेत केवळ दोन तृतीयांश डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे बळ उपलब्ध असतानाही सिव्हीलने कोरोना काळात अत्यंत चांगली सेवा देऊन एक मानदंड प्रस्थापित केला आहे. तसेच सलग तीन वर्षांपासून कायाकल्प पुरस्कार मिळवण्याचा चमत्कार करुन दाखवला आहे.

रुग्णसेवा अबधित रहावी आणि ती देखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र, आणि तपासणी करणारे अनुभवी डॉक्टर कार्यरत असल्याने समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्यास साहाय्य मिळते. खाजगी इस्पितळातील तज्ज्ञांपेक्षा जास्त सेवा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ देतात. मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि त्या जोडीला स्नेहभाव जोपासणारा कर्मचारीवर्ग यांचा एकत्रित प्रभाव म्हणून जिल्ह्यातील नागरिक सिव्हिलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देतात. सिव्हिलमध्ये दररोज शेकडो रुग्ण ॲडमिट होतात, तर बाह्यरुग्ण विभागातून रुग्ण उपचार घेऊन हजारो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जातात. रुग्णाच्या सर्वात जवळ असणारा आणि त्याची अहोरात्र सुश्रुषा करणारा परिचारिका वर्ग हा सुश्रुषेसह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण राखण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Web Title: 77 posts of doctors are vacant in government hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.