शिवजयंतीसाठी ७५ मंडळे एकत्र

By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:10+5:302016-03-16T08:29:50+5:30

एक नगर सामूहिक जयंती : सिडकोतून एकत्रित मिरवणूक

75 congregations together for Shiv Jayanti | शिवजयंतीसाठी ७५ मंडळे एकत्र

शिवजयंतीसाठी ७५ मंडळे एकत्र

 सिडको : तिथीनुसार येणारा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी यंदाच्या वर्षी सिडकोतील ७५ विविध मंडळांनी एकत्र येऊन सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची स्थापना केली असून, संपूर्ण सिडकोतील मंडळांची एकत्रित शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष गणेश अरिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपापसात हेवेदावे नको म्हणून या समितीवर केवळ एकच अध्यक्ष नेमण्यात आला आहे. इतर कुठलीही कार्यकारिणी नाही.
सिडको भागात दरवर्षी विविध सामाजिक मंडळे, संस्था व संघटनांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षी शिवाजी चौक, पाथर्डी फाटा, विजयनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, कामटवाडे आदि ठिकाणच्या सुमारे ७५ हून अधिक सार्वजनिक मंडळांनी बैठक घेऊन एकत्रित शिवजयंती साजरी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास विविध उपक्रमांद्वारे तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याचा समितीचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
येत्या शनिवारी (दि. २६) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सिडको भागात स्वराज मोटार सायकल रॅली, छत्रपतींचे पूजन याबरोबरच सायंकाळी सिडको भागातून सर्व मंडळांची एकत्रित भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. एकत्रीतपणे साजऱ्या करण्यात येणाऱ्या या जयंती उत्सवाविषयी कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह असून, मंडळांच्या या सामूहिक जयंती उत्सव उपक्रमाचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)

Web Title: 75 congregations together for Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.