साकोरा येथे ७३.९५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:10 IST2021-01-15T21:44:58+5:302021-01-16T01:10:56+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे तिरंगी लढतीत झालेल्या मतदानात मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला. याठिकाणी ७३.९५ टक्के मतदान झाले.

73.95 per cent turnout in Sacora | साकोरा येथे ७३.९५ टक्के मतदान

साकोरा येथे ७३.९५ टक्के मतदान

साकोरा ग्रामपंचायतीत तीन पॅनलमध्ये जोरदार लढत झाली. शुक्रवारी (दि.१५) मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. दरम्यान, अनेक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने गोंधळ उडाला होता. अनेक अशिक्षित मतदारांमध्ये निशाणीचा गोंधळ झाल्याने अनेक मते बाद होण्याचे संकेत मिळत आहेत. जि.प. शाळा आणि का.भा.पा. विद्यालय याठिकाणी एकूण ११ मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. साकोरा येथे एकूण ६७८४ मतदान असून, त्यात ३५९२ पुरुष तर ३१९२ महिला मतदार आहेत. त्यातील २६३८ पुरुषांनी, तर २३७९ महिला मतदारांनी असे एकूण ५०१७ मतदारांनी आपला हक्क बजावला.

Web Title: 73.95 per cent turnout in Sacora