दुकानातून लॅपटॉपसह ७२ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:51 IST2018-02-18T22:50:34+5:302018-02-18T22:51:41+5:30
नाशिकरोड : सिन्नरफाटा येथे पशु-खाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने ६२ हजारांची रोकड व लॅपटॉप असा ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला.

दुकानातून लॅपटॉपसह ७२ हजार लंपास
नाशिकरोड : सिन्नरफाटा येथे पशु-खाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने ६२ हजारांची रोकड व लॅपटॉप असा ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला.
चेहडी पंपिंग उज्ज्वल कॉलनी येथे राहणारे भगवान तुकाराम आडके यांचे सिन्नरफाटा येथे पशुखाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकान आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास आडके यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. आडके सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसून आले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील ६२ हजार रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आडके यांच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेल्या फुटेजनुसार सदर चोरी रात्री २ वाजेच्या सुमारास झाली. त्यामध्ये चोरट्यांचा चेहरा कैद झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ६५ हजारांची घरफोडीबंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शरणपूर लिंकरोड परिसरात घडली़ न्यू कृष्णा विहार अपार्टमेंटमधील रहिवासी श्रीकांत कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरातील ४० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व पाच हजार रुपयांची हार्डडिस्क असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़